विरम विरसायासादस्माद्दुरध्यवसायतो विपदि महतां धैर्यध्वंसं यदीक्षितुमीहसे ॥ अपि जडमते कल्पापाये व्यपेत निजक्रमाः कुलशिखरिणः क्षुद्रा नैते न वा जलराशयः ॥
हे तों नव्हेत कुलपर्वत की ढळाया कीं क्षुद्र सागर नव्हेत उचंबळाया ॥ ज्यांचे महाप्रळयिं धैर्य पहा चळेना त्यांशीं दुराग्रह नको तुज हे कळेना ॥