सत्यानृता च परुषा

सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च
हिंस्त्रा दयालुरपि चार्थपरा वदान्या ॥
नित्यव्यया प्रचुरनित्यधनागमा च
वेश्याङ्गनेव नृपतिनीतिरनेकरूपा ॥

केव्हां सत्य वदे वदे अनृतही केव्हां वदे गोडही
केव्हा अप्रियही दयालुहि असे केव्हां करी घातही ॥
जोडी अर्थही जे यथेष्ट समयीं कीं वेंचही आदरी
ऎशी हे नृपनीति भासत असे वारांगनेचे परी ॥