शशी दिवसधूसरो

शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी
सरो विगतवारिजं मुखमनक्षरं स्वाकृतेः ॥
प्रभुर्धनपरायणः सततदुर्गतः सज्जनो
नृपाङ्गणगतः खलो मनसि सप्त शल्यानि मे ॥

चंद्राला दिवसा प्रकाश नसणे ये कामिनील जरा
पद्मावीण जळें निरक्षर मुखीं जो नेटका गोजिरा ॥
दात्याला धनलोभ नित्य असणे दारिद्य्र विद्वज्जनीं
दुष्टाचा पगडा महीपतिगृहीं हीं सात शल्यें मनीं ॥