जातिर्यातु रसातलं गुणगणस्तस्याप्यधो गच्छतां शीलं शैलतटात्पतत्वभिजनः सण्दह्यतां वन्हिना ॥ शौर्ये वैरिणि वज्रमाशु निपत्त्वर्थोऽस्तु नः केवलं येनैकेन विना गुणास्तृणालवप्रायाः समस्ता इमे ॥
राहो जाति रसातलीं सुगुण हे राहोत त्याखालतें शैलाग्राहुनि शील सत्वर पडो सौजन्य अग्नींत तें ॥ शूरत्वावरि आदळॊ अशनिका हे सर्वही नावडे अर्थप्राप्ति असो निरंतर मला त्यावीण हे यापुढे ॥