प्रकरण २ - संख्यास्थान निर्णय

संख्यांची स्थानपरत्वे किंमत दाखविणारे श्लोक ११ व १२ खाली दिले आहेत.
एकदशशत्सहस्रायुतलक्षप्रयुतकोट्यःक्रमशः ।
अर्बुदमब्जं खर्वमहापद्मशंकवस्तस्मात् ॥११॥
 
जलधिंचान्त्यं मध्यं परार्धमिति दशगुणोत्तरं संज्ञाः
 संख्यायाः स्थानानां व्यवहारार्थ कृता पूर्वेः ॥१२॥

मराठी अर्थ
( उजवीकडून डावीकडे) अनुक्रमाने एकं, दहं, शतं, सहस्र, अयुत ( दशसहस्र), लक्ष, प्रयुत ( दशलक्ष), कोटि, अर्बुद( दशकोटि), अब्ज, खर्व, निखर्व, महापद्म, शंकु, जलधि, अंत्य, मध्य, परार्ध ही संख्यास्थाने आहेत. ह्या प्रत्येक स्थानाची किंमत उजवीकडील स्थानाच्या दसपट आहे. ही मूल्याम्ची ( स्थानपरत्वे) दशमानपद्धति पूर्वाचार्यांनीच सुलभ व्यवहाराठी केली आहे.
वरील श्लोकात सर्वात जास्त संख्या परार्ध ( १०‍ चा १८वा घात) एवढी दिली आहे. मात्र संस्कृत साहित्यात एकूण १०च्या ५४व्या घातापर्यंतच्या संख्यांना नावे आहेत.