उद्दिष्टे
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन व ज्ञान प्रसार करण्याच्या उद्देशाने ज्ञानदीप एज्युकेशन अँण्ड रिसर्च फौंडेशन, सांगली ही सार्वजनिक विश्वस्त संस्था २००५ मध्ये स्थापन करण्यात आली. संस्थेची मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा ( १९५०) अन्वये नोंदणी करण्यात आली असून नोंदणी क्रमांक ई-१५३०/सांगली हा आहे.
उद्दिष्टे
- माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करून लोकशिक्षण, विज्ञान प्रसार आणि रोजगार निर्मिती करणे.
भाषा, धर्म, स्थान यामुळे निर्माण होणार्या अडथळयांना पार करून ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविणे. वेबसाईट व संगणक प्रणाली विकसित करणे व त्यातून भारतात राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी यासाठी प्रयत्न करणे. - इंटरनेटवर मिळणार्या ज्ञानाचा स्रोत वापरून भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ज्ञान वितरित करणार्या व्यक्तींचे संघटन करणे व अशी ज्ञानप्रसार केंद्रे उभारणे.
- माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी शाळा, महाविद्यालय व संशोधन प्रयोगशाळा, तसेच ग्रंथालय उभारणे व शैक्षणिक पोर्टल वेबसाईट तयार करणे.
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन संस्थांशी विविध विषयावरील दूरस्थ शिक्षणासाठी सहकार्य करणे.
- विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीची माहिती देण्यासाठी परिसंवाद, प्रशिक्षण शिबिरे व प्रदर्शने आयोजित करणे तसेच जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे.
- परदेशात राहणार्या भारतीयांपर्यत येथील साहित्य व संस्कृती पोहोचविणे व त्यांच्याकडून भारताच्या प्रगतीसाठी साहाय्य मिळविणे.
- माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतास सशक्त राष्ट्र बनविणे आणि जागतिक मानवकल्याणासाठी ज्ञानप्रसार करण्यात भारताला अग्रेसर करणे.
- वरील उद्दिष्टांस पूरक ठरतील असे अन्य कार्यक्रम घेणे वा त्यात सहभागी होणे.
- ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. सांगली या वेबसाईट व सॉफ्टवेअर विकसित करणार्या संस्थेने फौंडेशनच्या कामास सहकार्य म्हणून खालील वेबसाईट निर्माण करून दिल्या आहेत.