स्वरसंधी

स्वरांचे दोन प्रकार आहेत।
१)सजातीय २)विजातीय
१)अ,आ २)इ,ई ३)उ,ऊ ४)'ऋ','ऋ',अ,इ,उ,ए,ऐ,ओ,औ हे एकमेकांचे विजातीय स्वर अहेत.

स्वरसंधीचे पाच प्रकार -
१)सजातीय स्वरांचा 'सवर्णदीर्घसंधि'
२)विजातीय स्वरांचा 'गुणसंधि'
३) वृद्धिसंधि
४) 'यण् संधि'
५)'अयादि संधि'

संधी करण्याबाबत काही नियम घालून दिलेले आहेत.

१)सवर्णदीर्घ संधि :- सूत्र-अक: सवर्णे दीर्घ:

सजातीय स्वर एकमेकांपुढे आल्यास दोन्ही स्वरांबद्दल त्याच प्रकारचा दीर्ग स्वर येतो. याला 'सवर्णदीर्घ संधि' म्हणतात.
उदा. = अ,आ + अ,आ = आ
आ + आ=आ
इ,ई + इ,ई=ई
ई+ई=ई
उ,ऊ +उ,ऊ=ऊ
उदा. -

(क)
अ + अ = आ ->धर्म + अर्थ = धर्मार्थ, च+अपि=चापि

अ + आ = आ -> हिम + आलय = हिमालय, पुस्तक + आलय = पुस्तकालय,तस्य+ आदेश: = तस्यादेश:

आ + अ = आ -> विद्या + अर्थी = विद्यार्थी

आ + आ = आ -> विद्या + आलय = विद्यालय

(ख)

इ + इ = ई --> रवि + इंद्र = रवींद्र ; मुनि + इंद्र = मुनींद्र;गच्छति + इति = गच्छतीति

इ + ई = ई --> गिरि + ईश = गिरीश ; मुनि + ईश = मुनीश;वदति +ईश:=वदतीश:

ई + इ = ई- मही + इंद्र = महींद्र ; नारी + इंदु = नारींदु

ई + ई = ई- नदी + ईश = नदीश ; मही + ईश = महीश .


(ग)
उ + उ = ऊ- भानु + उदय = भानूदय ; विधु + उदय = विधूदय;भानु+उपाय:=भानूदय:;किन्तु+ उपाय:=किन्तूपाय:

उ + ऊ = ऊ- लघु + ऊर्मि = लघूर्मि ; सिधु + ऊर्मि = सिंधूर्मि

ऊ + उ = ऊ- वधू + उत्सव = वधूत्सव ; वधू + उल्लेख = वधूल्लेख

ऊ + ऊ = ऊ- भू + ऊर्ध्व = भूर्ध्व ; वधू + ऊर्जा = वधूर्जा च+अपि=चपि

२) गुणसंधि - 'अ' किंवा 'आ' या स्वारांपुढे 'इ,ई' किंवा 'उ,ऊ' किंवा 'ऋ' यांच्यापैकी कोणताही स्वर आल्यास दोन्हि स्वर मिळून अनुक्रमे 'ए','ओ', 'अर्' हे स्र येतात। या 'ए','ओ','अर्' स्वरांना गुन म्हणतात। म्हणून या संधींना 'गुणसंधि' म्हणतात।
अ,आ + इ,ई =ए
अ,आ +उ,ऊ =ओ
अ,आ +ऋ=अर्
उदा. -
(क)
अ + इ = ए ; नर + इंद्र = नरेंद्र;तव +इदम् = तवेदम्

अ + ई = ए ; नर + ईश= नरेश

आ + इ = ए ; महा + इंद्र = महेंद्र;तथा + इति=तथेति

आ + ई = ए महा + ईश = महेश;

(ख)
अ + उ = ओ ; ज्ञान + उपदेश = ज्ञानोपदेश ;वृक्षस्य +उपरि=वृक्षस्योपरि

आ + उ = ओ ,महा + उत्सव = महोत्सव;चंद्रकला + उमानाथस्य= चंद्रकलोमानाथस्य

अ + ऊ = ओ, जल + ऊर्मि = जलोर्मि 

आ + ऊ = ओ, महा + ऊर्मि = महोर्मि

(ग) अ + ऋ = अर्, देव + ऋषि = देवर्षि

(घ) आ + ऋ = अर्, महा + ऋषि = महर्षि;वर्षा + ऋतु:=वर्षर्तु:

३) वृद्धिसंधि - 'अ' किंवा 'आ' या स्वारांपुढे 'ए,ऐ' किंवा 'ओ,औ' यापैकी स्वर आल्यास दोन्ही स्वर मिळून अनुक्रमे 'ऐ' किंवा 'औ' हे स्वर येतात. 'ऐ' , 'औ' या स्वरांना 'वृद्धी' म्हणतात। म्हणून या संधीला 'वृद्धिसंधि' म्हणतात.
अ,आ + ए,ऐ= ऐ
अ,आ + ओ,औ = औ
उदा. -
(क)
अ + ए = ऐ ; एक + एक = एकैक ;

अ + ऐ = ऐ मत + ऐक्य = मतैक्य

आ + ए = ऐ ; सदा + एव = सदैव

आ + ऐ = ऐ ; महा + ऐश्वर्य = महैश्वर्य;सदा + ऐच्छत् = सदैच्छत्

(ख)
अ + ओ = औ, बालाय + ओदनम् = बालायौदनम्,

आ + औ = औ महा + औषधि = महौषधि


अ + औ = औ, परम + औषध = परमौषध ;;वन + औषधि = वनौषधि ;तव + औदार्यम् = तवौदार्यम्


४) यण् संधि - 'इ,ई','उ,ऊ','ऋ,ऋ','लृ' या स्वरांपुढेकोणताही विजातीय स्वर आल्यास 'इ,उ,ऋ,लृ' ऐवजी क्रमाने 'य्','व्','र्','ल्' हे वर्ण येतात व दुसर्या पदातील स्वर त्या वर्णात मिसळतो. 'य्','व्','र्','लृ' या व्यंजनांच्या गटाला 'यण्' म्हणतात. म्हणून या संधीला 'यण् संधि' म्हणतात.


इ + अ = य् + अ ; यदि + अपि = यद्यपि;इति + अपि = इत्यपि;स्वस्ति + अहम् = स्वस्त्यहम्

ई + आ = य् + आ ; इति + आदि = इत्यादि

ई + अ = य् + अ ; नदी + अर्पण = नद्यर्पण;देवी + असि = देव्यसि

ई + आ = य् + आ ; देवी + आगमन = देव्यागमन

उ + अ = व् + अ ; अनु + अय = अन्वय

उ + आ = व् + आ ; सु + आगत = स्वागत;उपविशतु + आर्य:=उपविशत्वार्य:

उ + ए = व् + ए ; अनु + एषण = अन्वेषण

ऊ + आ= य् + आ; वधू + आगमनम् = वध्वागमनम्

ऋ + अ = र् + आ ; पितृ + आज्ञा = पित्राज्ञा


५) अयादि संधि - 'ए,ऐ,ओ,औ' या स्वरांपुढे कोणताही स्वर आल्यास 'ए,ऐ,ओ,औ' यांच्याजागी अनुक्रमे 'अय्,आय्, अव्, आव् हे वर्ण येतात. यातील य् आणि व् मध्ये पुढील स्वर मिसळून पूर्णाक्षर होते किंवा य् आणि व् हे पदाच्या शेवटी आले तर त्यांचा विकल्पाने लोप होतो. त्यानंतर जवळ आलेल्या स्वरांचा पुन्हा संधी होत नाही. याला 'अयादि संधि' म्हणतात।
उदा. -
(क) ए + अ = अय् + अ ; ने + अन = नयन

(ख) ऐ + अ = आय् + अ ; गै + अक = गायक

(ग) ओ + अ = अव् + अ ; पो + अन = पवन

(घ) औ + अ = आव् + अ ; पौ + अक = पावक

औ + इ = आव् + इ ; नौ + इक = नाविक

समीपे + एव = समीपयेव (ए चा अय्) = समीप एव ( य् चा विकल्पाने लोप)
तस्मै + अदर्शयत् = तस्मायदर्शयत (ऐ चा आय्) = तस्मा दर्शयत् (य् चा विकल्पाने लोप)
प्रभो + एहि = प्रभवेहि (ओ चा अव्)= प्रभ एहि (व् चा विकल्पाने लोप)
आश्रमौ + आस्ताम् = आश्रमावास्ताम् (औ चा आव्)= आश्रमा आस्ताम् (व् चा विकल्पाने लोप)

विशेष नियम -
एकदा संधी केल्यानंतर दोन स्वर एकमेकांपुढे आले तरी त्यांचा परत संधी केला जात नाही.

 

Hits: 2747
X

Right Click

No right click