ज्ञानदीप संचालिका स्व. सौ. शुभांगी सुरेश रानडे  

अल्प परिचय 

जन्म - २ ऑक्टोबर १९४७   मृत्यु-२२ ऑगस्ट २0१६

पूर्वाश्रमीचे नाव - सुमन दत्तात्रय शिंत्रे

शिक्षण - एम्‌ एड. बी. एड् (संस्कृत) , पुणे

सांगली आणि मिरज येथील शाळांमधून शिक्षिका म्हणून काही काळ नोकरी. तसेच सुयश कॉम्प्युटर्स् या संस्थेतर्फे १९८५ ते २००० पर्यंत संगणक शिक्षणाचे कार्य.

इ. स. २००० मध्ये ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. ची स्थापना. 

मायमराठी,  मायसांगली व संस्कृतदीपिका या वेबसाईट्सची निर्मिती.

काव्यदीप हा पहिला कविता संग्रह २००२ मध्ये प्रसिद्ध

२००५ मध्ये ज्ञानदीप फौंडेशन, सांगलीची स्थापना

सांगावा  हा दुसरा काव्यसंग्रह आणि ‘संस्कृतदीपिका पुस्तक व सीडी  यांची २००६ साली प्रसिद्धी.

२००८ मध्ये मराठी साहित्य संमेलनानिमित्त साहित्यसागर या वेबसाईटची निर्मिती.

सय या तिसर्‍या काव्य संग्रहाचे २०१३ मध्ये प्रकाशन

तीनही कवितासंग्रह तसेच संस्कृत शब्दकोश व सुभाषित यांचे अँड्रॉईड् एप् प्रसिद्ध

ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि.च्या संचालिका व ज्ञानदीप फौंडेशन, सांगलीच्या विश्वस्त या नात्याने शेवटपर्यंत कार्यरत.

ज्ञानदीप परिवारातर्फे त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !

X

Right Click

No right click