समास प्रस्तावना

दोन किंवा अनेक पदे (शब्द) एकत्र येऊन त्यांचे एक स्वतंत्र पद बनणे याला समास असे म्हणतात. ही पदे विशिष्ट रीतीने - काही नियमांप्रमाणे - एकत्र जोडली जाऊन एक जोडशब्द तयार होतो. असा जोडशब्द म्हणजेच समास किंवा सामासिक शब्द होय. अर्थात् या साठी या जोडल्या गेलेल्या शब्दांमध्ये काही विशिष्ट संबंध असावा लागतो. सामासिक शब्दातील पदांची अर्थानुसार केलेली फोड, उकल म्हणजेच समासाचा विग्रह होय. संस्कृत भाषेत समासप्रचुर रचना ही एक वैशिष्टयपूर्ण बाब समजली जाते त्यामुळे भाषेचे सौंदर्य वाढते. भाषेला आटोपशीरपणा व रेखीवपणा येतो. समास करण्यासाठी कमीत कमी दोन शब्द लागतात. एका शब्दाचा कधीही समास होत नाही. मराठीत सुध्दा कित्येक सामासिक शब्द आपण अगदी सहजपणे वापरतो. कारण मराठीही संस्कृतभाषेचेच रुप आहे. उदा. पुरणपोळी, आईवडील, राजवाडा, चंद्रोदय इ. कमीत कमी शब्दातून जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करण्याची क्षमता सामाजिक शब्दात असते. भाषेला अधिकाधिक खुलविण्याचे काम करणारा समास हा एक महत्वाचा घटक आहे.

समास करताना कमीत कमी दोन पदे लागतात. पूर्वपद म्हणजे पहिले पद व उत्तरपद म्हणजे नंतर येणारे पद होय. यापैकी कोणते पद अर्थाच्या दृष्टीने अधिक महत्वाचे आहे. यावरुन समासांचे प्रकार पाडले जातात.

१) अव्ययीभाव पूर्वपदप्रधान
२) तत्पुरुष उत्तरपदप्रधान
३) द्वन्द्व उभयपदप्रधान
४) बहुव्रीहि अन्यपदप्रधान

यापैकी अव्ययीभाव वगळता बाकी तीनही प्रकारांचे उपप्रकार आहेत ते खालील प्रमाणे-

तत्त्पुरुष
१) कर्मधारय - द्विगु हा कर्मधारय समासाचा पोटप्रकार
२) विभक्ति तत्पु.
३) नञ्‌तत्पु.
४) प्रादितत्पु.
५) उपपदतत्पु.

द्वन्द्व
१) इतरेतर द्वन्द्व
२) समाहार द्वन्द्व

बहुब्रीही-
१) समानाधिकरण बहुब्रीही
२) व्याधिकरण बहुब्रीही
३) नञ्‌बहुब्रीही
४) सहबहुब्रीही
५) प्रादिबहुब्रीही

 

Hits: 3332
X

Right Click

No right click