संस्कृत उतार्यांचे भाषांतर (९-१०)
९) संस्कृत -
कस्मिंश्चिदधिष्ठाने चत्वारो ब्राह्मणपुत्रा परस्परं मित्रभावमुपगता वसन्ति स्म । तेषां त्रयः शास्त्रपारङ्गताः परं बुद्धिरहिताः । एकस्तु बुद्धिमान् केवलं शास्त्रपराङ्गमुखः । अथ कदाचित् तैर्मन्त्रितम् - को गुणो विद्याया यदि देशान्तरं गत्वा भूपतीन् परितोष्य अर्थोपार्जनं न क्रियते । तत्पूर्वदेशं गच्छामः । तथानुष्ठिते कश्चिन्मार्गं गत्वा तेषां ज्येष्ठः प्राह - अहो, अस्माकमेकः चतुर्थो केवलं बुद्धिमान् ।
मराठी -
कोण्या एका शहरात चार ब्राह्मणपुत्र परस्परांचे मित्र होऊन (असल्यासारखे) रहात होते. त्यांच्यापैकी तीन शास्त्रप्रवीण पण निर्बुद्ध होते. एक बुद्धिमान परंतु शास्त्र न शिकलेला होता. नंतर एकदा त्यांनी विचार केला, “जर आपण परदेशात जाऊन तेथील राजांना संतुष्ठ करून धन मिळवले नाही तर (आपल्या) विद्येचा काय उपयोग? तेव्हा आपण (प्रथम) पूर्वेकडील देशाला जाऊ या.” तसे केल्यावर (पूर्वेकडील देशाला गेल्यावर) त्यांच्यातला सर्वात वडीलधारा (भाऊ) म्हणाला, “अहो, आपल्यातील चौथा फक्त बुद्धिमान आहे. (त्याने शास्त्रपठण केलेले नाही.)”
१०) संस्कृत -
अस्ति अर्बुदशिखरनाम्नि पर्वते दुर्दान्तो नाम सिंहः । तस्य पर्वतकन्दरे शयानस्य केसराग्राणि कश्चिन्मूषकः प्रत्यहं छिनत्ति । तेन संक्रुद्धः स सिंहो विवरान्तर्गतं मूषकमलभमानोऽचिन्तयत् _ ‘क्षुद्रशत्रुं हन्तुं तत्सदृश एव सैनिकः पुरस्कार्यः’ । इत्यालोच्य तेन ग्रामं गत्वा विश्वासमुत्पाद्य कश्चित् बिडालो यत्नेनानीतो मांसाहारं च दत्वा स्वगुहायां स्थापितः । ततः प्रभृति बिडालभयान्मूषको बिलान्न निःसरति । सिंहोऽप्यक्षतकेसरः सुखेन स्वपिति ।
मराठी -
अर्बुदशिखर नावाच्या पर्वतावर दुर्दान्त नावाचा एक सिंह (राहत) होता. तो परवताच्या गुहेत झोपी गेला म्हणजे दररोज एक उंदीर त्याच्या आयाळीची टोके कुरतडीत असे. त्यामुळे अतिशय रागावलेला तो सिंह बिळात गेलेला उंदीर सापडत नसल्यामुळे विचार करू लागला - अगदी क्षुल्लक शत्रूला ठार मारण्यासाठी त्याच्यासारखाच सैनिक पुढे केला पाहिजे.’ असा विचार करून त्याने गावात जाऊन व विश्वास उत्पन्न करून (खात्री पटवून) मोठ्या प्रयासाने एक मांजर आणले, आणि मांस खाण्यास देऊन त्याला आपल्या गुहेत ठेवले. तेव्हापासून मांजराच्या भीतीने उंदीर बिळातून बाहेर पडत नसे. आणि तो सिंहही आयाळ कुरतडली जात नसल्यामुळे सुखाने झोपत असे.