संस्कृत उतार्‍यांचे भाषांतर (५-६)

५) संस्कृत -
अस्ति कस्मिंश्चिन्नगरे सोमदत्तो नाम ब्राह्मणः । स कदाचिद्‌ यज्ञार्थं पशुप्रार्थनायै ग्रामान्तरं गतः । तत्र तेन कश्चिद्‌ यजमानो याचितः । यजमानाच्छागं लब्ध्वा तं च स्कन्धे धृत्वा गच्छन्‌ स धूर्तत्रयेणावलोकितः । ततस्तैर्मिथोऽभिहितम्‌ । यद्येष छागः केनाप्युपायेन लभ्यते तदस्य भक्षणात्‌ हिमनिवारणं भवेत्‌ । एवं विचिन्त्य ब्राह्मणस्यागमनं प्रतीक्षमाणा वृक्षत्रयतले स्थिताः ।

मराठी -
कोण्या एका गावात सोमदत्त नावाचा ब्राह्मण होता. एकदा यज्ञासाठी पशु (बोकड) मागण्यासाठी (तो) दुसर्‍या गावाला गेला. तेथे त्याने एका यजमानाजवळ (बोकड) मागितला. यजमानापासून बोकड मिळवून व तो खांद्यावर टाकून जाणार्‍या त्याला तीन लुच्च्यांनी (ठकांनी) पाहिले. तेव्हा त्यांनी आपापसात म्हटले, “जर हा बोकड कोणत्यातरी उपायाने मिळाला तर याच्या भक्षणामुळे आपली थंडी नाहीशी होईल.” याप्रमाणे विचार करून ते (तिघे) तीन झाडांच्या तळाशी (बुंध्याशी त्याची) वाट पहात बसले.

६) संस्कृत -
अस्ति कश्चिन्महीपतेर्मनोरमं शयनस्थानम्‌ । तत्र श्वेततरपटलमध्यसंस्थिता मन्दविसर्पिणी नाम यूका प्रतिवसति स्म । सा च तस्य महीपतेः रक्तमास्वादयन्ती सुखेन कालं नयमाना तिष्ठति । अन्येद्युश्च तत्र शयने क्वचिद्‌ भ्राम्यन्नग्निमुखो नाम मत्कुणः समायातः । अथ तं दृष्ट्वा विषण्णवदना प्रोवाच ।

मराठी -
कोण्या एका राजाचे एक सुंदर शयनगृह होते. तेथे अतिशुभ्र अशा वस्त्रांच्या जोडीमध्ये (दोन चादरींमध्ये) हळूहळू चालणारी एक ऊ रहात होती. ती त्या ठिकाणी राजाचे रक्त पीत सुखाने कालक्रमणा करीत होती. एके दिवशी त्या बिछान्यात अग्निमुख नावाचा ढेकूण भटकत (भटकत) आला. त्याला पाहून खिन्न झालेली ती (ऊ) त्याला म्हणाली.