संस्कृत उतार्‍यांचे भाषांतर (३-४)

३) संस्कृत -
अस्ति कस्मिंश्चित्‌ समुद्रोपकण्ठे महाजम्बूपादपः सदाफलः । तत्र रक्तमुखो नाम वानरो प्रतिवसति स्म ।
तत्र च तस्य तरोरधः कदाचित्‌ करालमुखो नाम मकरः समुद्रजलसलिलान्निष्क्रम्य तीरोपान्ते निविष्टः । ततश्च रक्तमुखेन स प्रोक्तः “ भो भवानभ्यागतोऽतिथिः । तद्‌ भक्षयतु भवान्‌ मया दत्तान्यमृतकल्पानि जम्बूफलानि ” इति । एवमुक्त्वा तस्मै जम्बूफलानि प्रयच्छति ।

मराठी -
समुद्राजवळच्या एका भागात एक सतत फळे देणारे मोठे जांभळाचे झाड होते. तेथे रक्तमुख नावाचा वानर रहात असे. एकदा त्या झाडच्या खाली करालमुख नावाचा सुसर समुद्राच्या पाण्यातून बाहेर पडून काठाजवळ बसलेला (पडलेला) होता. तेव्हा रक्तमुखाने त्यास म्हटले, “अहो आपण (येथे) अतिथि पाहुणे आहात. तेव्हा मी दिलेली अमृतासारखी गोड जांभळे खा.” असे बोलून त्याला जांभळे देऊ लागला.

४) संस्कृत -
अस्ति मगधदेशे चम्पकवती नामारण्यानि । तस्यां चिरान्महता स्नेहेन मृगकाकौ निवसतः । स च मृगः स्वेच्छया भ्राम्यन्‌ हृष्टपुष्टाङ्गः शृगालेनावलोकितः । तं दृष्वा शृगालोऽचिन्तयत्‌ “आः कथमेतन्मांसं सुललितं भक्षयामि । भवतु विश्वासं तावदुत्पादयामि ।”

मराठी -
मगध देशात चंपकवती नावाची अरण्ये होती. त्यामध्ये बराच काळ हरिण व कावळा मोठ्या प्रेमाने रहात होते. ते हरिण स्वैरपणे भटकत गलेलठ्ठ झालेले आहे, असे एका कोल्ह्याने पाहिले. त्याला बघून कोल्हा विचार करू लागला, “हे लुसलुशीत मांस मला कसे खायला मिळेल? ठीक आहे. मी याचा विश्वास तर प्रथम संपादन करतो. ”