संस्कृत उतार्यांचे भाषांतर (१९-२०)
१९) संस्कृत -
एकदा सर्वे पक्षिणः भगवतः गरुडस्य यात्राप्रसङ्गेन समुद्रतीरं गताः । ततः काकेन सह वर्तकश्चलितः । अथ गोपालस्य मस्तके स्थितात् दधिभाण्डात् दधि वारंवारं तेन काकेन खाद्यते । ततो यावदसौ गोपालो दधिभाण्डं भूमौ निधायोर्ध्वं वीक्ष्यते तावत्तेन काकवर्तकौ दृष्टौ । ततस्तेन खेदितः काकः पलायितः । वर्तको मन्दगतिस्तेन प्राप्तो व्यापादितश्च । अत उच्यते - “न स्थातव्यं न गन्तव्यं दुर्जनेन समं क्वचित्” ।
मराठी -
एकदा गरूड महाराजांच्या (महाशयांच्या) यत्रेसाठी सर्व पक्षी समुद्राकिनार्याला (किनार्यावर) जात होते. तेव्हा कावळ्याबरोबर गांजीण पक्षी चालला होता. त्यावेळी त्या कावळ्याने गवळ्याच्या डोक्यावर असलेल्या दह्याच्या भांड्यातून वरचेवर दही खाल्ले. नंतर जेव्हा दह्याचे भांडे जमिनीवर ठेवून गवळी वर पाहू लागला तेव्हा त्याला कावळा व गांजीण पक्षी दिसले. त्यावेळी त्याने (त्या गवळ्याने) हाकलून दिलेला कावळा पळून गेला. (दूर उडून गेला.) हळू चालणारा उडणारा गांजीण पक्षी मात्र त्याला (त्या गवळ्याला) मिळाला व मारला गेला. म्हणून म्हणतात, “कधी (कधीही) दुष्टांबरोबर राहू नये व जाऊ नये. (दुष्टांची संगत धरू नये.)
२०) संस्कृत -
अथ कदाचित् कस्याचित् शशकस्य वारः समायातः । सोऽचिन्तयत् - “यद्यहं पञ्चत्वं गमिष्यामि तत् किं मे सिंहानुनयेन” । इत्यालोच्य स आहारवेलातिक्रमं कृत्वा मन्दं मन्दमगच्छत् । सिंहोऽपि क्षुधाक्रान्तः सकोपं तमवदत् - “कुतस्त्वं विलम्ब्य समागतोऽसि ?” शशकोऽब्रवीत् - “देव नायं ममापराधः । अहमागच्छन् पथि सिंहान्तरेण निरुद्धः । तस्याग्रे पुनरागमनाय शपथं कृत्वा स्वामिनं निवेदयितुमत्रागतोऽस्मि” इति ।
मराठी -
नंतर एकदा (सिंहाकडे जाण्याचा, जाण्याची) कोण्या एका सशाचा वार आला. (सशाची पाळी आली.) त्याने असा विचार केला “(काहीही झाले तरी) जर मी मरणारच आहे तर मी सिंहाची विनंती (मनधरणी) का करावी ?” असा विचार करून जेवणाची वेळ उल्लंघून टाळून तो हळूहळू (सावकाश) गेला. भुकेने व्याकुळ झालेला सिंह रागाने त्याला असे म्हणाला, “इतका उशीर करून का आलास ?” ससा म्हणाला, “महाराज, हा (यात) माझा काही अपराध (दोष, गुन्हा) नाही. रस्त्याने येणार्या (येत असताना) मला दुसर्या एका सिंहाने अडविले. त्याच्यापुढे पुन्हा येण्याची शपथ घालून (शपथेवर परत येतो असे त्याला सांगून) महाराजांना (आपल्याला हे वृत्त) सांगण्यासाठी मी येथे आलो आहे.”