संस्कृत उतार्यांचे भाषांतर (१७-१८)
१७) संस्कृत -
एकदा कयाचिद् देवाङ्गनया दुर्वाससे मुनयो कश्चित् दिव्यो रत्नहारः प्रदत्तः । सोऽपि तपोनिधिस्तं दिव्यहारं सुरपतये ददौ । अथ देवेन्द्रः स्वस्यैरावतस्य मस्तके तं रत्नहारं कौतुकेन न्यदधात् । तदा स गजस्तं दूरे प्राक्षिपत्। ततोऽतिरोषणो दुर्वासा निजोपहारस्य हारस्येममवमानं वीक्ष्य देवेन्द्रं तथैव सर्वान्सुरान् “अतः परं यूयं सर्वे बलहीना भूत्वाऽसुरैः पराजिता भविष्यथ ”इत्यशपत् । ततः देवेन्द्रेण सहिताः सर्वे देवा युद्धेऽसुरैः पराभूताः सञ्जज्ञिरे ।
मराठी -
एकदा कोण्या एका अप्सरेने दुर्वास ऋषींना एक (दैवी) मूल्यवान हार (रत्नमाला) दिला (दिली) . त्या ऋषींनी तो दैवी हार (देवांच्या राजाला) इंद्राला दिला. नंतर इंद्राने गंमत म्हणून (मोठ्या कौतुकाने) तो रत्नहार आपल्या ऎरावताच्या मस्तकावर ठेवला. तेव्हा त्या हत्तीने (ऎरावताने) तो हार दूर फेकून दिला. त्यावेळी अत्यंत रागीट अशा त्या दुर्वासांनी स्वतःच्या (स्वतः भेट म्हणून दिलेल्या) नजराण्याची हाराची अवहेलना पाहून इंद्राला तसेच सर्व देवांना असा शाप दिला, “आजपासून पुढे तुम्ही सर्वजण शक्तिहीन होऊन राक्षसांकडून पराभूत व्हाल.” नंतर इंद्रासहित सर्व देव युद्धात राक्षसांकडून पराभूत झाले.
१८) संस्कृत -
अथ दुर्वाससः शापवशात् असुरैः पराजिताः सर्वे देवाः पुरन्दरं पुरस्कृत्य बह्माणं शरणमयुः । तदा प्रजापतिस्तानाह - “अमृतोपलब्धये भवन्तो महोदधिं मथ्नन्तु । सागरमन्थनात् सम्प्राप्तममृतं प्राश्य भवन्तोमरत्वं गच्छेयुः” इति । तज्ज्ञात्वा “वयमपि समुद्रात् सुधां विन्देमहि” इति मन्यमाना असुराः सागरमन्थनकर्मणि देवानां सहाया अभवन् । ततश्चतुरा देवा दैत्यान् वञ्चयित्वा महोदधेरमृतकुम्भं स्वयमेव लेभिरे । ततोऽमृताशनात् तेऽमरत्वं प्राप्त्वा युद्धे दानवान् पराजयन्त ।
मराठी -
नतर दुर्वासाच्या शापामुळे पराभूत झालेले सर्व देव इंद्राला बरोबर घेऊन (पुढे करून) ब्रह्मदेवाला शरण गेले. तेव्हा ब्रह्मदेव त्यांना म्हणाला, “अमृत मिळवण्यासाठी आपण (तुम्ही सर्वांनी) समुद्रमंथन करा. सागरमंथनातून मिळालेले प्राप्त झालेले अमृत पिऊन आपण (तुम्ही सर्वजण) अमरत्वाला जाल. (अमर व्हाल.) ते जाणून (ते कळल्यावर) आपण सुद्धा सागरातून अमृत मिळवू. (आपल्याला पण अमृत मिळू शकेल) असे मानून (असा विचार करून) राक्षस सागरमंथनाच्या कामात देवांचे मदतनीस झाले (राक्षसांनी देवांना मदत केली.) तेव्हा अत्यंत कुशल असे देव राक्षसांना फसवून समुद्रातील अमृतकुंभ स्वतःच मिळवते झाले. (देवांनी अमृतकुंभ स्वतःच मिळविला.) नंतर अमृत पिऊन अमरत्व मिळवलेले देव (मिळवलेल्या देवांनी) युद्धात राक्षसांचा पराभव करते झाले. (देवांनी राक्षसांचा पराभव केला.)