संस्कृत उतार्यांचे भाषांतर (१५-१६)
१५) संस्कृत -
तत् श्रुत्वा कर्पूरतिलकस्तमपृच्छत् , “कस्त्वम्? कुतश्च समायातः?” सोऽवदत्, “जम्बूकोऽहं सर्व वनवासिभिः पशुभिर्मिलित्वा तव सकाशं प्रेषितः ।” हस्ती पुनरभाषत ,“किमर्थम्?” शृगालोऽब्रवीत्, “यद् विना नृपतिनाऽवस्थातुं न युक्तं तदत्राटवीराज्येऽभिषेक्तुं त्वमेव सर्वस्वामिगुणोपेतो निरूपितः । तद् यथा लग्नवेला न विचलति तथा कृत्वा सत्वरमागम्यताम् ।” इत्युक्त्वोत्थाय प्रचलितः ।
मराठी -
ते ऎकून कर्पूरतिलक त्याला म्हणाला, “कोण आहेस तू ? आणि कोठून आला आहेस ?” तो म्हणाला, “रानातील सर्व पशूंनी मिळून तुमच्याजवळ पाठविलेला मी कोल्हा आहे. (मी कोल्हा आहे. रानातील सर्व पशूंनी मिळून मला तुमच्याकडे पाठविले आहे.)” हत्ती पुन्हा म्हणाला, “कशासाठी ?” कोल्हा म्हणाला, “राजाशिवाय अरण्यात राहणे योग्य नाही. तेव्हा अरण्यराज्यामध्ये (अरण्यराज्याचा राजा म्हणून) सर्व राजगुणांनी युक्त असा तूच निवडलेला आहेस (तुमचीच निवड केली आहे.) तेव्हा मुहूर्त टळणार नाही असे करून (यासाठी) लवकर यावे.” असे बोलून उठून निघाला.
१६) संस्कृत -
ततोऽसौ राज्यलोभाकृष्टः कर्पूरतिलकः शृगालमार्गेण धावन् महापङ्के निमग्नः । ततः स गजोऽभाषत, “सखे शृगाल, किमधुना करोमि? पङ्के पतितोऽहं म्रिये । परावृत्य पश्य” इति । तदा शृगालेन विहस्योक्तम्, “देव अधुना मम पुच्छकावलम्बनं कृत्वोत्तिष्ठ । यन्मम वचसि त्वया प्रत्ययः कृतस्तद् इदानीमनुभूयतामशरणं दुःखम् ” इति ।
मराठी -
तेव्हा राज्याचा लोभ सुटलेला तो कर्पूरतिलक (हत्ती) कोल्ह्याच्या रस्त्याने (मागून) धावत असता चिखलात पडून रुतला. (रुतून बसला.) तेव्हा तो हत्ती असे म्हणाला, “अरे कोल्ह्या, आता काय करू रे ? चिखलात पडलेला मी (बाहेर न येऊ शकल्याने) येथेच मरून जाईन. मागे वळून तर बघ माझ्याकडे ” तेव्हा कोल्हा हसून असे म्हणाला, “महाराज, आता माझ्या शेपटीचा आधर घेऊन उठा. ज्याअर्थी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवलात त्याअर्थी तेव्हा आता उपाय नसलेले (भयंकर) दुःख अनुभवावे लागणार (तुम्हाला. किंवा दुःख अनुभवायला तयार व्हा.)