संस्कृत उतार्‍यांचे भाषांतर (१३-१४)

१३) संस्कृत -
सरमा नाम देवानां स्वामिभक्ता शुनी आसीत्‌ । एकदा पणयो नामासुरा देवानां धेनूरपाहरन्‌ । तदा देवेन्द्रः सरमामाहूयाभाषत - “सरमे, सत्वरं धेनूनामन्वेषणाय गच्छ” इति । तदा सरमाऽपि निर्भयतया पणीनां देशं गता । पणयस्तां कृतकेन स्नेहेनाभाषन्त - “सरमे, आगच्छ । दुग्धं पिब, नवनीतं च भक्षय । परं देवेभ्यो धेनूनां कामपि वार्तां मा कथय ” इति । सरमा तु पणीनामातिथ्यमविगणय्य तान्‌ च निर्भर्त्स्य देवलोकं प्रत्यागता । सुरेन्द्राय च धेनूनां वार्तामकथयत ।

मराठी -
सरमा नावाची देवांची स्वामिनिष्ठ (अशी एक) कुत्री होती. एकदा पणी नवाच्या राक्षसांनी देवांच्या गाई (आपल्या देशात) पळवून नेल्या. तेव्हा देवांचा राजा (इंद्र) सरमेला बोलावून असे म्हणाला, “सरमे ताबडतोब गाईंचा शोध घेण्यासाठी जा.” तेव्हा सरमा सुद्धा न घाबरता पणींच्या देशाला (देशात) गेली. पणी तिला खोट्या (खोट्याखोट्या ) प्रेमाने असे म्हणाले, “सरमे ये. दूध पी आणि लोणी खा. परंतु देवांना गाईंची (गाईंबद्दलची) कोणतीही बातमी (हकीकत) सांगू नको. ” परंतु सरमेने पणींच्या आतिथ्याची (पाहुणचाराची) पर्वा न करता (पाहुणचार न घेता) आणि (तसेच) त्यांची निंदा करून देवलोकात (स्वर्गात) परत आली. आणि तिने देवांच्या राजाला (इंद्राला) गाईंची बातमी सांगितली.

१४) संस्कृत -
कस्यचिद्‌ राज्ञो वानरोतिभक्तपरोऽङ्‌गसेवको बभूव । एकदा मध्यान्हे राजा निद्रां गतः । वानरश्च व्यजनेन तस्मै वायुं ददाति । अत्रान्तरे राज्ञो वक्षःस्थलस्योपरि मक्षिकोपविष्टा । कपिना व्यजनेन मुहुर्मुहुनिषिध्यमानाऽपि सा पुनस्तत्रैवोपविशति । तदा क्रुद्धेन वानरेण तीक्ष्णं खड्गमादाय तस्या उपरि प्रहारो विहितः । ततो मक्षिकोड्डीय गता । तीक्ष्णधारेणासिना च राज्ञो वक्षो द्विधा जातम्‌ । सपद्येव स मृतः ।

मराठी -
कोण्या एका राजाचा (राजाकडे त्याच्यावर) अतिशय निष्ठा (विश्चास) असलेला असा एक वानर (त्याचा) शरीररक्षक (सेवक) होता. एकदा दुपारच्या वेळी राजा झोपला होता. वानर पंख्याने त्याला वारा घालीत होता. दरम्यान राजाच्या छातीवर एक माशी बसली. वानराकडून पंख्याने वारंवार हाकलून दिली जात असली तरी ती पुन्हा त्या ठिकाणीच (राजाच्या छातीवर) येऊन बसत होती. (वानराने त्या माशीला पंख्याने वारंवार हाकलून दिली पण ती माशी पुन्हा तेथेच - राजाच्या छातीवर - येऊन बसत होती.) रागावलेल्या वानराने धारदार तलवार घेऊन तिच्यावर घाव घातला. तेव्हा माशी उडून गेली आणि धारदार तलवारीमुळे राजाच्या छातीचे दोन तुकडे झाले. (आणि) ताबडतोब तो मरण पावला.