११) संस्कृत -
कस्मिंचित्‌ वृक्षे हंसकाकौ निवसतः स्म। एकदा मध्यान्हे कोऽपि व्याधस्तत्र तरुतलमागत्य गाढं प्रसुप्तः । । ततः क्षणान्तरे तन्मुखाद्‌ वृक्षच्छायाऽपगता । तदातपेन तन्मुखं व्याप्तमवलोक्य हंसेन स्वपक्षौ प्रसार्य तन्मुखे छाया कृता । ततो निर्भरनिद्रासुखमनुभवता तेन व्याधेन मुखव्यादानम्कुतम्‌ । अथ स्वभावकुटिलः काकस्तस्य मुखे स्वविष्ठां प्रक्षिप्य पलायितः । प्रबुद्धो व्याधो यदोर्ध्वमैक्षत तदा स हंसस्तस्य दृष्टिपथमायातः । तदा सत्वरं तेन बाणेन स व्यापादितः ।

मराठी -
एका झाडावर (एक) हंस व (एक) कावळा असे दोघे राहत होते. एकदा दुपारी एक पारधी तेथे त्या झाडाखाली येऊन झोपला. नंतर थोड्या वेळाने त्याच्या तोंडावरून झाडाची सावली दूर गेली. तेव्हा त्याच्या तोंडावर ऊन पडलेले पाहून हंसाने आपले दोन्ही पंख पसरून त्याच्या तोंडावर सावली केली. त्यावेळी गाढ झोपेत असलेल्या (झोपेचे सुख अनुभवणार्‍या) त्या पारध्याने तोंड उघडले. तेव्हा स्वभावतःच दुष्ट असलेला कावळा त्याच्या तोंडात स्वतःची विष्ठा टाकून पळाला. जागा झालेल्या पारध्याने जेव्हा वर पाहिले तेव्हा तो हंस त्याच्या दृष्टीस पडला. लगेच त्याने बाण सोडून त्याला ठार केले.

१२) संस्कृत -
पाटलिपुत्रनामधेये नगरे सुदर्शनो नाम राजा बभूव । तस्य पुत्रा अनधिगतशास्त्रा नित्यमुन्मार्गगामिनश्च। तादृशान्‌ तान्‌ वीक्ष्य चिन्तामग्नो राजा पण्डितसभां कारितवान्‌ । सभायां पण्डितानुद्दिश्य स उवाच - “भोः भोः पण्डिताः ! अस्ति कश्चिदेवंभूतो विद्वान्‌ यो ममैतेषां पुत्राणां नीतिशास्त्रोपदेशेन पुनर्जन्म कर्तुं शक्नुयात्‌” इति । तदा विष्णुशर्मा नाम पण्डितोऽब्रवीत्‌ - “देव, अहं षण्मासाभ्यन्तर एव तवैतान्‌ पुत्रान्‌ नीतिशास्त्राभिज्ञान्‌ करिष्यामि इति मे प्रतिज्ञा” इति ।

मराठी -
पाटलिपुत्र नावाच्या नगरात सुदर्शन नावाचा राजा होता. त्याचे (त्याला) शास्त्र (विद्या) न शिकलेले (मूर्ख), नेहमी वाईट मार्गाने जाणारे (उनाड, स्वच्छंदी) असे मुलगे होते (अशी मुले होती). तशाप्रकारच्या त्यांना पाहून चिंतातुर (असा तो) राजा विद्वानांची सभा करविता झाला (चिंतातुर अशा त्या राजाने विद्वानांची सभा भरविली). सभेतील विद्वानांना उद्देशून तो असे म्हणाला, “अहो विद्वान्‌ (मंडळी), असा कोणी विद्वान्‌ (पंडित) ह्या सभेत आहे का, की जो माझ्या अशा मुलांचा नीतिशास्त्राच्या उपदेशाने पुनर्जन्म करू शकेल?” तेव्हा विष्णुशर्मा नावाचा विद्वान्‌ असे म्हणाला, “महाराज, मी सहा महिन्यांच्या आतच तुमच्या (आपल्या) अशा मुलांना नीतिशास्त्रात प्रवीण (पारंगत) करीन अशी माझी प्रतिज्ञा आहे.”

Hits: 1448
X

Right Click

No right click