संस्कृत उतार्‍यांचे भाषांतर (१-२)

१) संस्कृत -
आसीत्पुरा सूर्यवंशे दिलीपो नाम नृपः । स सर्वगुणैरुपेतस्तथाच सकलशास्त्रनिपुण आसीत्‌ । प्रजापालने स दक्षः । तस्य सुदक्षिणा नामानुरूपा भार्या । सा तस्य प्राणेभ्योऽपि प्रिया । इह जगति सुतमुखदर्शनं विना सर्वाण्यन्यानि सुखानि सुलभानि । अतः सन्तानार्थं कमप्युपायं चिन्तयितुं स वसिष्ठाश्रमं गतः । मुनिं सादरं प्रणम्य तस्मै स स्वमनोरथं न्यवेदयत्‌ ।
मराठी -
पूर्वी सूर्यवंशात दिलीप नावाचा राजा होता. तो सर्वगुणसंपन्न व सर्व शास्त्रांमध्ये निपुण होता. प्रजेच्या पालनात तो तत्पर (दक्ष) होता. त्याची सुदक्षिणा नावाची अनुरूप (योग्य) पत्नी होती. या जगातील पुत्रमुखदर्शनाशिवाय अन्य सर्व सुखे त्याला सहज मिळाली होती. म्हणून मुलासाठी (मूल होण्यासाठी) काहीतरी उपायाचा विचार करण्यसाठी तो वसिष्ठांच्या (वसिष्ठ ऋषींच्या) आश्रमात गेला. ऋषींना आदरपूर्वक नमस्कार करून तो आपले मनोगत त्यांना सांगता झाला. (त्याने आपले मनोगत ऋषींना सांगितले.)

२) संस्कृत -
भारतीय युद्धस्य दशमे दिने कौरवाणां सेनापतिर्भीष्मो हतः । अतो दुर्योधनो द्रोणाचार्यं तत्पदे न्ययुङ्क्त । दुर्योधनं समाधातुं द्रोणेन प्रतिज्ञा कृता । अहमभेद्यं चक्रव्यूहं रचयित्वा कमपि महारथं शत्रुं व्यापादयामीति । अपरेद्युः संशप्तकैर्युद्धाय आहूतोऽर्जुनो गतस्तैः सह योद्धुम्‌ । अतो द्रोणेन रचितं चक्रव्यूहं भेत्तुमर्जुनं विना न कोऽपि पाण्डवः समर्थ इति दृष्ट्वा युधिष्ठिरश्चिन्ताकुलोऽभवत्‌ ।
मराठी -
भारतीय युद्धाच्या दहाव्या दिवशी कौरवांचा सेनापति भीष्म मारला गेला म्हणून दुर्योधन त्या पदावर द्रोणाचार्यांस नियुक्त करता झाला. (दुर्योधनाने त्या पदावर द्रोणाचार्यांची नेमणूक केली.)
दुर्योधनाचे समाधान करण्यासाठी द्रोणाने प्रतिज्ञा केली. “मी सेनेची अभेद्य अशी चक्रव्यूहरचना करून उद्या शत्रूचा कोणतातरी महारथी ठार मारेन.” दुसर्‍या दिवशी संशप्तकाकडून लढाईला आव्हान दिला गेलेला अर्जुन त्यांच्यबरोबर लढण्यासाठी गेला. द्रोणाने रचलेला चक्रव्यूह भेदण्यास अर्जुनाखेरीज दुसरा कोणी पांडव समर्थ नाही म्हणून युधिष्ठिर चिंतातुर झाला.