मोठी वाक्ये (संस्कृत-मराठी)

संस्कृत मराठी
अत: जना: कोकिलं परभृत इति वदन्ति । महणून लोक कोकिळेला दुसर्‍याकडून भरणपोषण झालेली असे म्हणतात.
अतीव सुबोधा खलु संस्कृतभाषा । संस्कृत भाषा अतिशय सोपी आहे.
अध्यापका: छात्रेषु नित्यं स्निह्यन्ति एव । शिक्षक विद्यार्थ्यांवर नेहमी प्रेम करतात.
अयि आनन्द, अतीव शोभना खलु तव अभ्यासकक्षा । अरे आनंद, तुझी अभ्यासाची खोली अतिशय सुंदर आहे.
अस्माकं अध्यापका: अध्यापनकाले अपि छात्रेभ्य: न कुप्यन्ति । आमचे शिक्षक अभ्यासाच्या वेळी सुद्धा विद्यार्थ्यांना रागावत नाहीत.
अस्माकं प्रशाला अतिभव्या, मनोहरा च । आमची शाळा अतिशय मोठी व सुंदर आहे.
अस्माकं प्रशालायां सहस्राधिका: छात्रा: पठन्ति । आमच्या शाळेत हजारो (हजाराहून अधिक) विद्यार्थी शिकतात.
अस्माकम् नगरे श्रीगणेशस्य एकं विशालम् मन्दिरम् अस्ति । आमच्या गावात श्रीगणेशाचे (गणपतीचे) एक मोठे देऊळ आहे.
अहं भक्तानां हृदये एव वसामि, न वैकुण्ठे । मी भक्तांच्या हृदयातच राहतो, वैकुंठात (स्वर्गात) नव्हे. (असे देव म्हणतो.)
आम्रवृक्ष: कोकिलानां अतीव प्रिय: । आंब्याचे झाड (हे) कोकिळ पक्ष्यांचे अत्यंत आवडते असते.
आरक्ता पूर्वा दिशा सूर्यस्य आगमनं सूचयति । तांबूस (रंगाची) पूर्व दिशा सूर्याच्या आगमनाची (सूर्योदयाची) सूचना देते.
आरोग्यं धनसंपदा । आरोग्य (हेच खरे) धन, संपत्ती (होय).
एतद् पुस्तकं कञ्चित् कालं मह्यं यच्छसि किम् ? हे पुस्तक काही काळ (थोडा वेळ) मला देशील काय ?
एतस्मिन् घटीयन्त्रे दिनदर्शिका अपि अस्ति । ह्या घड्याळात दिनदर्शिका (कॅलेंडर) सुद्धा आहे.
एतै: ज्ञानेन्द्रियै: अधिगच्छामि अहं विश्वस्य ज्ञानम् । ह्या ज्ञानेंद्रियांनी मी (सर्व) जगाचे ज्ञान मिळवतो.
कर्णौ, नयने, नासिका, जिह्वा, त्वचा च मम ज्ञानेन्द्रियाणि । (दोन) कान, (दोन) डोळे, नाक, जीभ आणि त्वचा ही माझी ज्ञानेंद्रिये आहेत.
कृषकस्य ललाटात् स्वेदबिन्दव: स्रवन्ति, क्षेत्रे च पतन्ति । शेतकर्‍याच्या कपाळावरून घामाचे थेंब ओघळतात आणि शेतात पडतात.
कृषीवल: उच्चै: गानेन तथा स्निग्धेन स्पर्शेन वृषभौ प्रेरयति । शेतकरी मोठ्या (आवाजातील) गाण्याने आणि प्रेमळ स्पर्शाने बैलांना प्रेरणा देतो.
कृष्णं वन्दे जगद्गुरुम् । जगद्गुरू (सर्वांना वंदनाय अशा) कृष्णाला मी नमस्कार करतो.
कोकिलस्य वर्ण: कृष्ण:, परं तस्य कुहूरव: अतीव मधुर: । कोकिळेचा रंग काळा (असला तरी) तिचा कुहू असा आवाज मात्र अतिशय गोड असतो.
कोकिला: स्वानि अणडानि काकानां नीडेषु निक्षिपन्ति । कोकिळा स्वत:ची अंडी कावळयाच्या घरट्यात ठेवतात.
कोकिलाया: शावका: काकशावकै: सह वसन्ति । कोकिळांची पिल्ले कावळयाच्या पिल्लांबरोबर राहतात.
चन्द्र: करै: कमलस्य कलिकां स्पृशति, तदा सा विकसति । चंद्र (आपल्या) किरणांनी कमळाच्या कळीला स्पर्श करतो तेंव्हा ती उमलते.
चरणाभ्याम् अहं तिष्ठामि, गच्छामि, धावामि, खेलामि च । (दोन) पायांनी मी उभा राहतो, जातो (चालतो), धावतो आणि खेळतो.
चित्र: कलाप: मयूरस्य सहजम् आभरणम् एव । रंगीबेरंगी पिसारा (म्हणजे) मोराचा जन्मजात अलंकार होय.
ते विशालाभ्यां पक्षाभ्यां उत्पतन्ति । विशाल पंखांमुळे (पंखांच्या मदतीने) ते (हंस) उडतात (उडू शकतात).
तेन क्षेत्रे धान्यमौक्तिकानां राशि: उद्भवति । त्यामुळे शेतात धान्यरूपी मोत्यांची रास तयार होते.
त्वम् एव माता पिता त्वम् एव । (हे देवा,) तूच माझी आई (व) तूच माझे वडील (होय).
दक्षिणेन हस्तेन अहम् अन्नं भक्षयामि, दुग्धं पिबामि, लिखामि च । उजव्या हाताने मी अन्न खातो, दूध पितो आणि लिहितो.
दीपो नाशयति ध्वान्तं, धनं आरोग्यं च यच्छति । दिवा अंधार नाहीसा करतो आणि संपत्ती व आरोग्य देतो.
दुग्धं पिबति मार्जार:, न पश्यति लगुडाहतिम् । मांजर मातीच्या ढेकळाचा मार पहात नाही (मार मिळाला तरी) दूध पिते.
न हि ज्ञानेन समं पवित्रं अत्र वर्तते । येथे (ह्या जगात) ज्ञानासारखे पवित्र (पूज्य काहीही) नसते.
नयनाभ्याम् अहं पदार्थानाम् आकारान्, वर्णान् च पश्यामि । (दोन) डोळयांनी मी पदार्थांचे आकार व रंग पाहतो (पाहू शकतो).
पञ्जरबन्ध: एव शुकानां मधुरालापस्य फलम् । पिंजर्‍यात अडकून पडणे हेच पोपटांच्या गोड बोलण्याचे फळ होय.
परमेश्वरस्य कृपया मम शरीरस्य अवयवा: कार्येषु अतीव क्षमा: । परमेश्वराच्या कृपेने माझ्या शरीराचे अवयव (आपापल्या) कामात सक्षम आहेत.
पालिता: शुका: पञ्जरेषु निवसन्ति । पाळीव पोपट पिंजर्‍यात राहतात.
प्रभाते तिमिरं शनै: शनै: नश्यति । पहाटे अंधार हळूहळू नाहीसा होतो.
प्रशालाया: पृष्ठत: एकं विशालं क्रीडाङ्गणं अस्ति । शाळेच्यामागे एक मोठे पटांगण आहे.
बकस्य वर्णः शुभ्र:, दीर्घा ग्रीवा च । बगळयाचा रंग पांढरा आणि मान लांब (असते.)
बका: जले चिरं तिष्ठन्ति, स्वभक्ष्यं च अन्विष्यन्ति । बगळे पाण्यात बराच वेळ उभे राहतात आणि स्वत:चे खाद्य शोधतात.
बकानां श्वेता: माला: आकाशे मुक्ताहारा: इव विलसन्ति । बगळयांच्या पांढर्‍या रांगा आकाशात मोत्याच्या माळेप्रमाणे शोभून दिसतात.
मनोहर: मयूर: शारदाया: वाहनम् । शारदेचे वाहन (म्हणजे) सुंदर मोर होय.
मयूर: अस्माकं भारतीयानां राष्ट्रीय: विहग: । आपल्या भारतीयांचा मोर (हा) राष्ट्रीय: पक्षी (आहे).
मयूरस्य कण्ठ: नील:, अत: तं नीलकण्ठ: इति वदन्ति । मोराचा कंठ निळा (असतो) म्हणून त्याला नीलकंठ असे म्हणतात.
मयूरा: मेघानां दर्शनेन तुष्यन्ति, नृत्यन्ति च विस्तारितेन कलापेन । ढगांच्या दर्शनाने मोर आनंदित होतात आणि पिसारा फुलवून नाच करतात.
मार्गे अशोक: मित्रेण सह उच्चै: संलपति । वाटेत (रस्त्यात) अशोक मित्रांबरोबर मोठ्याने बोलतो (गप्पा मारतो).
मूढा: काका: कोकिलाया: शावकान् पालयन्ति इति कविसंकेत: । मूर्ख कावळे कोकिळांच्या पिल्लांचे पालनपोषण करतात अशी कविकल्पना आहे.
मूर्खस्य नास्ति औषधम् । मूर्खाला (मूर्खपणाला) औषध नसते (मूर्ख मनुष्य शहाणा होणे कठीण असते).
लता: महीरुहाणाम् आश्रयेण वर्धन्ते । वेली झाडांच्या आधाराने वाढतात.
वन्या: शुका: वृक्षाणां कोटरेषु वसन्ति । रानटी (अरण्यात राहणारे) पोपट झाडांच्या ढोलीत राहतात.
विकसितै: कमलै: सरोवरस्य शोभा वर्धते एव । फुललेल्या कमळांनी सरोवराची शोभा वाढतेच.
विद्या विनयेन शोभते । नम्रपणामुळे विद्या शोभून दिसते.
विद्यासमं नास्ति परं विभूषणम् इति सुपरिचितम् ध्येयवाक्यम् । विद्येसारखा श्रेष्ठ अलंकार नाही असे (हे) ध्येयवाक्य सुपरिचित आहे.
विविधै: पुष्पै:, फलै: च मित्रं पूजयति इव सृष्टि: । सृष्टी जणू काही निरनिराळया फुलांनी आणि फळांनी सूर्याची पूजा करते.
वृक्षा: सत्पुरुषा: इव । झाडे सज्जनांप्रमाणे (परोपकारी असतात).
शठा: बका: भक्ष्यस्य ग्रहणप्रसङ्गे ध्यानम् इव आचरन्ति । लबाड बगळे भक्ष्य पकडण्याच्या वेळी जणू काही ध्यानस्थ असतात.
शुकस्य वर्ण: हरित:, चञ्चुपुटम् ताम्रम् । पोपटाचा रंग हिरवा (असतो), चोच लाल (असते).
शुका: पठितान् शब्दान् आलपन्ति, । पोपट शिकविलेले शब्द बोलतात.
श्रीगणेशाय नम: । श्रीगणेशाला (माझा) नमस्कार असो.
सत्यम् एव जयते । सत्याचाच विजय होतो.
सरोवरस्य तीरे विविधा: पादपा: रोहन्ति । सरोवराच्या काठी वेगवेगळी झाडे उगवतात.
सर्वे गुणा: काञ्चनम् आश्रयन्ते । सर्व गुण सोन्याच्या (संपत्तीच्या) आधाराने राहतात (संपत्तीला चिकटून येतात).
सर्वे जना: कार्यारम्भे श्रीगणेशम् एव प्रणमन्ति । सर्व लोक (कोणत्याही) कामाच्या सुरूवातीला गणपतीलाच नमस्कार करतात.
सा खलु भारतीयानां सुष्ठु परिचिता भवति । ती भारतीयांच्या चांगली परिचयाची आहे.
सुन्दर: हंस: ब्रह्मदेवसय वाहनम् । ब्रह्मदेवाचे वाहन (म्हणजे) सुंदर हंस होय.
सूर्य: अस्तं गच्छति तदा अन्धकार: वर्धते । सूर्य अस्ताला जातो तेंव्हा अंधार वाढतो (वाढू लागतो).
हंसस्य शरीरं शुभ्रं, मनोहरं मन्दं गमनम् च । हंसाचे शरीर शुभ्र व सुंदर असून त्याची चाल मंद असते.
हंसा: जले, स्थले, आकाशे स्वैरं सञ्चरन्ति । हंस जमिनीवर, पाण्यात (आणि) आकाशात स्वैरपणे (स्वच्छंदपणे) विहार करतात.
हंसा: नीरक्षरविवेके कुशला: इति कविजना: वदन्ति । पाणी व दूध वेगळे करण्याच्या बाबतीत हंस निपुण असतात असे कवि म्हणतात.
हस्तस्य भूषणम् दानम् । दान (हाच खरा) हाताचा अलंकार होय.