ऋणनिर्देश

भोपाळ येथे राहणारे श्री. दयानंद दाबके यांना संस्कृत विषयाची आवड असून अनेक मराठी कवितांचे संस्कृतमध्ये त्यांनी भाषांतर केले आहे. संस्कृतदीपिका संकेतस्थळ पाहिल्यावर त्यांना ते आवडले व त्यानी संस्कृतदीपिकेच्या कार्यास मदत म्हणून ५००० रुपये परस्पर ज्ञानदीप फौंडेशनच्या खात्यात भरले व नंतर त्याविषयी आम्हाला कळवले.

पहिल्या देणगीनंतर काही संस्कृतप्रेमींकडे संस्कृतदीपिका पुस्तक पाठविण्यासाठी १००० रुपये व संस्कृत दिनानिमित्त आणखी ५००० रुपये ज्ञानदीप फौंडेशनकडे पाठविले.

त्यांच्या या औदार्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. त्यांनी दिलेल्या या देणगीचा उपयोग हे संकेतस्थळ अधिक परिपूर्ण करण्यासाठीच केला जाईल याची आम्ही ग्वाही देतो. त्यांच्या या आर्थिक मदतीबद्दल आम्ही त्यांचे व्यक्तिशः व ज्ञानदीप फौंडेशनचे विश्वस्त या नात्याने आभारी आहोत.

---- सौ. शुभांगी सु. रानडे
----डॉ. सु. वि. रानडे