जग हे बंदीशाला

कुणी न येथे भला चांगला,
जो तो पथ चुकलेला !

ज्याची त्याला प्यार कोठडी
कोठडीतले सखे सौंगडी
हातकडी की अवजड बेडी,
प्रिय हो ज्याची त्याला !

जो तो अपुल्या जागी जखडे
नजर न धावे तटापलिकडे
उंबरातले किडे-मकोडे,
उंबरि करिती लीला !

कुणा न माहीत सजा किती ते
कोठुन आलो ते नच स्मरते
सुटकेलागी मन घाबरते,
जो आला तो रमला !

विश्वमेका बन्दिशाला,

कोsपि न अत्र अस्ति सुभद्र:,
सर्वे हि पथभ्रष्टा:, ध्रु.

यस्य तस्मै रोचते कारा,
कारास्थाणि तन्मित्राणि,
हस्तयोर्वा कटौ शृन्खला,
प्रत्येकस्य अस्ति रोचिका. 1.

प्रत्येकं स्वस्थाने बद्ध:,
द्रष्टुं न शक्त: तटात् पारं,
औदुम्बरस्थकृमिकीटकानाम्
औदुम्बरे हि लीला. 2.

न ज्ञायते कियान् दण्ड:,
कुत: एत: न वा स्मर्यते,
मुक्तये अपि मनो बिभेति,
य: एत: सोsरमत. 3.

गीत- ग. दि. माडगूळकर
संगीत- सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - जगाच्या पाठीवर
रागमिश्र - मांड

Hits: 953
X

Right Click

No right click