तुमन्त अव्यये

हेत्वर्थक अव्यये - (यालाच `तुमन्त' अव्यये असेही म्हणतात.) धातूला `तुम्' असा प्रत्यय जोडून ही अव्यये बनतात म्हणून त्यांना तुमन्त अव्यये असेही म्हणतात. `तुम्' या प्रत्ययामुळे `साठी' म्हणजेच `हेतू' हा चतुर्थीचा अर्थ स्पष्ट होतो.
तुमन्त अव्ययांचा उपयोग -
१) क्रियेचा हेतू किंवा उद्देश दाखविण्यासाठी तुमन्त अव्ययांचा उपयोग होतो म्हणून या अव्ययांना `हेत्वर्थक तुमन्त अव्यये ' म्हणतात.
२) तुमन्त अव्ययांचा उपयोग काही विशिष्ट धातूंबरोबर क्रियावाचक नामाप्रमाणे होतो.
कर्तुं जानाति । कर्तुं निपुण: । भोक्तुं काल: ।
३)काही धातूंबरोबर तुमन्त अव्ययांचा वापर केल्यास त्याचा अर्थ प्रार्थना, विनंती, अनुनय असा करावा.
उदा. क्षन्तुम् अर्हति महाराज: । - महाराजांनी क्षमा करावी.
श्रोतुम् अर्हति भवान् । - आपण कृपा करून ऐकावे.
हा प्रत्यय जोडताना काही धातूंमध्ये बदल होतात. काही धांतूपुढे `इ' हा जादा प्रत्यय म्हणजे आगम येतो. दहाव्या गणातील धातूंना व प्रयोजक धातूंना `अय' हे गणविकरण जोडून मग `तुम्' प्रत्यय लावला जातो.
ही तुमन्त रूपे करताना काही नियम आहेत. अर्थात् ते नियम पाठ करण्याची अजिबात गरज नाही. अशी तुमन्त रूपांची यादी वरचेवर वाचल्याने ती सहजपणे लक्षात राहतात.

स्वरांत धातूंची तुमन्तरूपे -

आकारान्त धातूंना `तुम्' जोडताना त्यात काही बदल होत नाही.
उदा. दा- दातुम् पा-पातुम् स्था-स्थातुम्
निर् + मा - निर्मातुम् आ + ख्या - आख्यातुम्

ऱ्हस्व इकारात, ऱ्हस्व उकारात, दीर्घ ईकारात व ऱ्हस्व ऋकारात धातूंना तुम् प्रत्यय जोडताना अन्त्य स्वरांचा गुण होतो.

उदा. जि-जेतुम्, चि-चेतुम् , नी-नेतुम्
श्रु - श्रोतुम् , कृ-कर्तुम् , स्मृ-स्मर्तुम्

दीर्घ ऊकारात धातूंच्या तुम् प्रत्ययापूर्वी `इ' आगम होतो.

उदा. भू- भवितुम्, पू-पवितुम् लू-लवितुम्

सन्ध्यक्षरान्त (ए, ऐ, ओ, औ) धातू आकारान्त बनतात.

उदा. व्हे - व्हातुम् , ध्यै - ध्यातुम् , गै - गातुम्
त्रै - त्रातुम् , सो - सातुम्

दीर्घ ऋकारान्त धातूंच्या तुम् प्रत्ययापूर्वी `इ' आगम विकल्पाने दीर्घ होतो.
तृ -तरितुम् , तरीतुम् , कृ - करितुम् , करीतुम्

दहाव्या गणातील धातूंना व प्रयोजक धातूंना तुम् प्रत्ययापूर्वी `इ' आगम होतो.

तड् - ताडयितुम् , कथ् - कथयितुम् , रच् - रचयितुम्
प्रयोजक - सम् + पद् - सम्पादयितुम् , वि + रम् - विरमयितुम्

काही व्यंजनान्त धातूंना तुम् प्रत्ययापूर्वी `इ' आगम होतो.
श्वस् - श्वसितुम् , भाष् - भाषितुम् , पत् - पतितुम् , श्रम् - श्रमितुम्

`इ' आगम न होणाऱ्या व्यंजनान्त धातूंमध्ये काही बदल होतात.
लभ् - लब्धुम् , दृश् - द्रष्टुम् , वच् - वक्तुम्

काही व्यंजनान्त धातूत काहीही बदल होत नाही.
मन् - मन्तुम् , हन् - हन्तुम् , शक् - शक्तुम्

काही धातूंच्या उपान्त्य ऱ्हस्व स्वराचा गुण होतो.
सिच् - सेक्तुम् , दिश् - देष्टुम् , मुच् - मोक्तुम् , शुभ् - शोभितुम्

Hits: 5019
X

Right Click

No right click