संधी प्रस्तावना

वाक्यातील अनेक वर्णांचा किंवा पदांचा पाठोपाठ उच्चार करणे याला ‘संहिता’ म्हणतात. संहिता झाल्यामुळे वर्णाचा होणारा जो बदल त्याला संधी असे म्हणतात. संस्कृत भाषेच्या अभ्यासात संधी हा महत्वाचा भाग आहे. गद्यलेखन करताना संधी करणे हे ऐच्छिक असते. परंतु पद्यलेखनात वा वाचनात संधी करुनच लिहावे, वाचावे लागते. संधी करणे म्हणजे व्याकरण नियमानुसार दोन वर्ण जुळवून आणणे. एका पदामध्ये उपसर्ग व धातू यामध्ये तसेच समासामध्ये संधी करणे गरजेचे असते. वर्णांचे स्वर व व्यंजने असे दोन प्रकार असतात.
स्वरांचे दोन प्रकार आहेत. १) सजातीय २) विजातीय.
समान जातीच्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. वेगवेगळया जातीच्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. एकमेकांचे सजातीय असणारे स्वर खालील प्रमाणे -
क) ‘अ’, ‘आ’
ख) ‘इ’, ‘ई’
ग) ‘उ’, ‘ऊ’
घ) ‘ऋ’, ‘ॠ’
अ, इ, उ, ए, ऐ, ओ, औ हे एकमेकांचे विजातीय स्वर आहेत.
संधीचे प्रमुख तीन प्रकार आहेत १) स्वरसंधी २) विसर्ग संधी ३) व्यंजन संधी
 

 

Hits: 2615
X

Right Click

No right click