धातुसाधित अव्यये
धातुसाधित अव्यये
धातुसाधित अव्यये धातूंपासून तयार केली जातात. खरे म्हणजे आपण मराठीत बोलताना नेहमी असे शब्द अगदी सहजपणे वापरतो. फक्त व्याकरणदृष्ट्या ते कसे बनलेले असतात याचा आपण विचार करत नसल्याने ते अगदी साधे म्हणजे घरच्या मंडळीप्रमाणेच वाटतात. पाहुण्यांसारखे वाटत नाहीत. उदा. `मीनाने घरी येऊन जेवण केले. जेवणानंतर विश्रांती घेण्यासाठी ती पलंगावर आडवी झाली.' या दोन वाक्यामध्ये अधोरेखित शब्द `येऊन' व `घेण्यासाठी' हे आपण अगदी सहजपणे वापरतो. वास्तविक बघता हे शब्द येणे व घेणे या मूळ क्रियापदांच्या पासून तयार केलेली रूपे आहेत. एकाच कर्त्याने (व्यक्तीने) केलेल्या दोन वेगवेगळया क्रिया असलेली वाक्ये एकत्र जोडण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. अशा प्रकारच्या शब्दांनाच संस्कृतमध्ये तुमन्त, त्वान्त व ल्यबन्त अव्यये असे म्हणतात. आणि खरं सांगायचं तर ती काही प्रत्येकाने स्वतंत्रपणे तयार करावी लागत नाहीत. ती तयार केलेली आहेतच. फक्त पुन्हा पुन्हा वापर करून ती लक्षात ठेवावी लागतात एवढेच. शेवटी `तुका म्हणे अभ्यास' हेच खरे. आणि अभ्यास म्हणजे सुद्धा दुसरे तिसरे काही नसून पुन्हा पुन्हा करणे म्हणजेच अभ्यास होय.
धांतूपासून बनणाऱ्या शब्दांना `धातूसाधित शब्द' असे म्हणतात. धातुसाधित शब्दांचे नाम, विशेषण आणि अव्यय असे तीन प्रकार आहेत.
धातुसाधित नामे फक्त क्रियेची जाणीव करून देतात. त्यांचा उपयोग इतर नामांप्रमाणे अनेक विभक्तीत होतो. ही नामे पुंलिंग स्त्रीलिंग व नपुंसकलिंग अशा सर्व लिंगात चालतात. उदा. नय:, नीति:, नमनम्, अधिगम:, गति:, गमनम्, स्थापनम्, लेखनम् इ.
येथे आपण धातुसाधित अव्यये पाहणार आहोत.
त्याचे मुख्यत्वे दोन प्रकार - १)हेत्वर्थक २) पूर्वकालवाचक
धातुसाधित अव्यये | ||
हेत्वर्थक | पूर्वकालवाचक | |
तुमन्त | त्वान्त | ल्यबन्त |