अव्यये

काही मूर्ती ह्या स्वयंभू असतात. तर काही घडीव असतात. त्याप्रमाणे भाषेमध्ये काही शब्द हे कोणत्याही प्रकारचे प्रत्यय अंगाला चिकटवून न घेणारे असे असल्याने त्यांना अव्यये म्हणतात.

सदृशं त्रिषु लिङ्गेषु सर्वासु विभक्तिषु ।
वचनेषु च सर्वेषु यन्न व्येति तदव्ययम् ।।

तीनही लिंगामध्ये, सर्व विभक्तीत, तसेच तीनही वचनांमध्ये ज्याचे रूप एकच असते, व ज्याच्यात काहीही बदल घडून येत नाही त्याला अव्यय असे म्हणतात. परंतु अशा अव्ययांना जोडीदार म्हणून विशिष्ट विभक्तिप्रत्यय लावलेले शब्दच लागतात. काही अव्ययांना विशिष्ट विभक्तींची अपेक्षा असते. अव्यये, त्यांचा अर्थ, अपेक्षित विभक्ती ह्या खालीलप्रमाणे असतात.

अव्यय

अर्थ

अपेक्षित विभक्ती

उदाहरण

अभित:, परित: च्या सभोवती द्वितीया मन्दिरं अभित:/परित: प्रदक्षिणां करोमि ।
प्रति च्या कडे द्वितीया स: मित्रं प्रति गच्छति ।
विना च्या शिवाय द्वितीया,
तृतीया,
पंचमी
गुरूं विना न ज्ञानलाभ: ।
जलेन विना जीवनम् अशक्यम् ।
भोजनात् विना न कोऽपि जीवति ।
सह, सार्धम्
साकम्, समम्
च्या बरोबर तृतीया गोपाला: कृष्णेन सह क्रीडन्ति स्म ।
सीता रामेण समम् वनं गता ।
अलम् पुरे
पुरेसा, समर्थ असणे
तृतीया
चतुर्थी
अलं दु:खेन ।
राम: रावणाय अलम् ।
नम: नमस्कार असो चतुर्थी श्रीगणेशाय नम: ।
स्वस्ति कल्याण असो चतुर्थी स्वस्ति अस्तु ते ।
अन्तिक च्या जवळ पंचमी मम गृहात् अन्तिकं उद्यानं आसीत् ।
ऋते च्या शिवाय पंचमी पर्जन्यात् ऋते सस्यलाभ: न ।
दूरम् पेक्षा लांब, अंतरावर, दूर पंचमी नगरात् दूरं मन्दिरं वर्तते ।
बहि: च्या बाहेर पंचमी मन्दिरात् बहि: विशाल: आम्रवृक्ष: अस्ति ।
प्रभृति पासून पंचमी बाल्यात् प्रभृति शिवराय: मातृभक्त: ।
अध: च्या खाली षष्ठी वृक्षस्य अध: शीतला छाया ।
अग्रे, पुर:, पुरत: च्या समोर षष्ठी शिवमन्दिरे शिवलिङ्गस्य पुरत: नन्दि: वर्तते ।
मन्त्रिमहोदयानां अग्रे अश्वारूढा: रक्षका: धावान्ति ।
उपरि च्या वर षष्ठी वसन्ते आम्रवृक्षस्य: उपरि कोकिल: वसति ।
किम्, किं प्रयोजनम् काय उपयोग?
काय आवश्यकता?
वस्तूची तृतीया व
व्यक्तीची षष्ठी
दुर्जनस्य उपदेशेन किम्?
तृप्तस्य भोजनेन किं प्रयोजनम्?
कृते च्या साठी षष्ठी अर्जुनस्य कृते कृष्णेन उपदेशं कृतम् ।
पश्चात् च्या मागे, नंतर षष्ठी मूषकस्य पश्चात् मार्जार: धावति ।
उपान्ते, समीपे च्या जवळ षष्ठी राज्ञ: समीपे सुरक्षासैनिका: वर्तन्ते ।

 

Hits: 3073
X

Right Click

No right click