धातु - मूलधातु

१,२,...१० एकूण दहा गण
संस्कृत भाषेत क्रियापद किंवा धातु दहा प्रकारात विभागले गेले आहेत. त्यांची नावे अशी
१)भ्वादि - भू + आदि (म्हणजे भू या धातूप्रमाणे चालणारे धातु )
२)अदादि
३)जुहोत्यादि.
४)दिवादि.
५) स्वादि
६)तुदादि.
७)रुधादि
८)तनादि.
९)क्र्यादि
१०)चुरादि

भ्वाद्यदादिजुहोत्यादिर्दिवादिः स्वादिरेव च।
तुदादिश्च रुधादिश्च तनादिक्रीचुरादयः॥

विकरण म्हणजे धातु आणि प्रत्यय यामध्ये येणारे अक्षर

पहिला गट
गण नावमूल धातुविकरणधातुरुप
भ्वादि भू भवति
दिवादि दिव् दिव्यति
तुदादि तुद् तुदति
१० चुरादि चुर् अय चोरयति
दुसरा गट
गण नावमूल धातुविकरणधातुरुप
अदादि अद् - अत्ति
जुहोत्यादि हु जुहोति
स्वादि सु नु सुनोति/सुनुते
रुधादि रुध् न् रुणद्धि/रुन्धे
तनादि तन् तनोति/तनोते
क्र्यादि क्री ना क्रीणीते

आ. प. - येथे क्रियापदाचा संबंध कर्त्याशी असतो.
प. प. - परस्मैपद - येथे क्रियापदाचा संबंध कर्ता नसून दुसरा शब्द असतो.
उ. प. - उभयपद - येथे क्रियापद दोन्ही प्रकारे चालते.
उदा. - १ प. प. = पहिला गण परस्मैपद

धातु कालार्थ रुपे -
1. लट् लकार (वर्तमानकाळ)
2. लृट् लकार (अद्यतन - प्रथम भविष्यकाळ )
3. लङ् लकार (अद्यतन भूतकाळ past tense)
4. लोट् लकार (आाज्ञार्थ) 5.लिङ् लकार (आशीर्लिंङ् आणि विधिर्लिंङ् )
आशीर्लिंङ्
6. विधिर्लिंङ् (विध्यर्थ)
7. लिट् लकार (परोक्ष भूतकाळ)
8. लुट् लकार (अनद्यतन भविष्यकाळ)
9. लुङ् लकार (नअद्यतन किंवा अनद्यतन भूतकाळ)
10. लृङ् लकार (combination of past and future tense with cause and effect relationship)
*अद्यतन - चालू वर्तमानकाळ
*अनद्यतन - नजिकचा भूतकाळ

Hits: 47